Sonawane Hemant

Create Your Badge

Search Topic Here

Thursday, July 14, 2011

मी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो....!!!!!!परवा दादर स्टेशनवर
एक मित्र दिसला
मला तो खुप खचलेला वाटला
विचारपुस केल्यावर
लखलखत्या दिव्यांसमोरही
अचानक अंधार पसरला
तो म्हणाला, परवा
महालक्ष्मी ला चाललो होतो
बायकोला पोरासोबत लेडीज मध्ये चढ्वून
स्वतः जेन्ट्स मध्ये चढ्लो
अचानक मोठा स्फोट झाला
हसता खेळता माझा मुलगा
काळ्या धुराआड लपला,
मी आणि बायको ने
त्याचा शोध घेतला
लाल चिखलातुन त्याला
अक्षरशः खेचुन काढ्ला
जरा थकलेला दिसला म्हणून
बायकोच्या कुशीत विसावला
सुजलेले डोळे किलकिले करुन
मला बायकोला म्हणाला-
देवबापाने माझी
आठवण काढली आहे,
बाबा मी पुढे जातो
पण
तुमची आठवण खुप येणार
रात्री झोपताना मला
गोष्ट कोण सांगणार?
शांतपणे डोळे मिटलेल्या माझ्या मुलाकडे बघुन
स्टेशनचा खांबन खांब द्रवला
भूकंपाने धरणी काय हादरेल-
असा स्टेशनचा वासान वासा कापला
पोराने पदर घट्ट धरला म्हणून
तीही सोबत गेली...
दोष नसताना :खाचा डोंगर
हाताने उकरतो आहे
त्यांचा स्म्रुतीसागरातील
एकेक शिंपला
भरल्या डोळ्यांनी जपतो आहे...
अचानक मित्र समोरच्या गर्दीत
नाहीसा झाला
तोबा गर्दीतही तो
पुर्णपणे एकाकी वाटला....

HemantS

My photo
Nashik, Maharashtra, India
BE- Computer Engineering, Pune University, Pune. MBA(Appearing),ICFAI University, Tripura. Address: At/post:Wadner, Teh:Malegaon, Dist:Nashik. Pin: 423206.